मार्च 2020 पासून देशावर करोनाचे मोठे संकट आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. उदयोगधंदे, व्यवसाय बंद आहेत. बर्याच पालकांच्या नोकर्या गेल्या आहेत. शेतीतील उत्पन्न अल्प आहे. अशातच गेल्या एक वर्षापासून विदयार्थ्याचे शिक्षण Online पद्धतीने चालू आहे. विद्यार्थी एकही दिवस कॉलेजला गेले नाहीत. कोणत्याही साधनसामुग्रीचा वापर विदयार्थ्यांनी केला नाही पंरतु महाविद्यालयांकडून संपूर्ण फी मात्र आकरली जात आहे. यामध्ये Maintenance charges, Laboratory fee, Gym fee, Computer lab fee, Uniform fee, Study Material, Stationary fee, Internet charges, Field work, Extra-curricular activities, Vehicle charges असे अनेक प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत. आता विद्यार्थ्यानी फी भरावी यासाठी महाविद्यालये दबाव टाकत आहेत
फी न भरल्यास फॉर्म इनवर्ड करून घेणार नाही किंवा internal exam ला बसू देणार नाही अशी धमकी वजा भाषा वापरली जात आहे. विदयापीठाचे फॉर्म इनवर्ड करण्याबाबतचे परिपत्रक असून देखील याबाबत महाविद्यालये विदयार्थ्यांना नाहक त्रास देत आहेत. याबाबत आपण तातडीने लक्ष घालून अशा महाविद्यलयांवर कारवाई करावी व विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षातली फी कमी करावी यासाठी डॉ.धनराज माने संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांची भेट घेण्यात आली.