परिक्षा बाबत महत्वाचे मुद्दे

 




परिक्षा बाबत महत्वाचे मुद्दे 

🔸प्रथम वर्ष 2019 पॅटर्नच्या सर्व अभ्यासक्रमांचे सर्व निकाल इथून पुढे महाविद्यालयांनी लावायचे आहेत, यासाठी एप्रिल मध्ये ऑनलाईन पद्धतीने झालेल्या परीक्षेचे मार्क विद्यापीठाकडून महाविद्यालयास पाठविण्यात आलेले आहेत.


या सर्व मार्कांचे तसेच इंटरनल, प्रात्यक्षिक, ओरल या मार्कांचे योग्य त्या पॅटर्ननुसार (70/30) कन्वर्सेशन करून निकाल महाविद्यालयास जाहीर करावयाचे आहेत. 


🔸 प्रथम वर्षाच्या निकालांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रथम वर्षाचा निकाल/तपशील (SGPA/CGPA) द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या निकालासाठी विद्यापीठामार्फत एका फॉरमॅटमध्ये मागविला जाईल त्या फॉरमॅटमध्ये महाविद्यालयांनी निकाल भरावयाचा आहे त्याचा उपयोग द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या एकत्रित निकालासाठी करण्यात येईल. 


🔸 दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सत्राच्या इंटरनल/ ओरल प्रॅक्टिकल /Viva या सर्व परीक्षांचे आयोजन करण्याचे सर्व अधिकार मा. प्राचार्यांना दिलेले आहेत. सदर अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यापीठाने घालून दिलेल्या नियमानुसार आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर करून दिनांक 15 जून पर्यंत पूर्ण कराव्यात, त्यानुसार 25 जून 2021 पर्यंत वरील सर्व परीक्षांचे मार्क्स विद्यापीठाच्या संकेतस्थळावर  इंटरनल मार्क लिंकला भरावयाचे आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये.


🔸पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सत्राच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या गुणांच्या समोर सध्या जाहीर झालेल्या निकालावर "NA" हा रिमार्क आलेला आहे, सदर मार्क विद्यापीठाकडे आहेत पुढील रिझल्ट बरोबर त्या विद्यार्थ्यांचे मार्क त्यांच्या निकालावर डिस्प्ले होणार आहेत.

 एक, तीन आणि पाच या सत्रांच्या निकालाच्या हार्ड कॉपी मिळणार नाहीत. एक, तीन, पाच आणि दोन, चार, सहा या सर्व सत्रांचे मिळून एकच मार्कशीट/ हार्ड कॉपी ऑगस्टमध्ये विद्यापीठामार्फत दिले जाणार आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post