द्वितीय सत्राची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावरच होणार


 

द्वितीय सत्राची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावरच होणार 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि द्वितीय सत्राची परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम शिकवून झालेल्या नसल्याने त्यात 30 टक्के कपात करण्यात आली आहे.


विद्यापीठाकडून द्वितीय सत्राच्या परीक्षा जून मध्ये ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे पूर्ण अध्यापन बाबत विद्यापीठाकडून नुकताच आढावा घेण्यात आला.त्यानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखे अंतर्गत विज्ञान शाखेतील तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचे काही अध्यापन बाकी आहे. बाकी असलेला अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी उरकून होणे अवघड आहे तसेच विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिके होऊ शकली नाहीत त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात आली आहे.

परंतु अभियांत्रिकी म्हणजेच इंजीनियरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण असणार आहे त्याच्यात काहीही कपात करण्यात आलेली नाही

Post a Comment (0)
Previous Post Next Post